Fri, Jul 19, 2019 05:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांची अर्धी फी घ्या

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांची अर्धी फी घ्या

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 15 2018 10:54PMमुंबई : प्रतिनिधी

प्रवेशाच्यावेळी 100 टक्के फी घेणार्‍या संस्थाचालकांना आता राज्यसरकारने चाप लावला आहे. अर्थिकदृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्यावेळी पात्र विद्यार्थ्यांना हिश्श्याची शिक्षण शुल्काची रक्कम पूर्ण न घेता अर्धीच घ्यावी असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. राज्यातील अनेक शिक्षण संस्था आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना 100 टक्के शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरतात. 100 टक्के शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. याबाबत सरकारकडे  विद्यार्थ्याकडून, पालकांकडून, विविध संघटनांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून तक्रारी आल्यानंतर शासनाने निर्णय जारी करून संस्थाचालकांना 50 टक्के फी घेण्याबाबत तंबी दिली आहे.

शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी आग्रह धरल्यास  अशा संस्थाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून फक्त त्यांच्या हिस्श्याची 50 टक्के रक्कम शिक्षण संस्थानी घेणे अपेक्षित आहे. उर्वरित  50 टक्के रक्कम शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ती शिक्षण संस्थांमध्ये भरने आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्क गरजेचे आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50 टक्के शिक्षण शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे असेही आदेशात नमूद केले आहे.