Wed, Nov 21, 2018 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पानसरे खून : आणखी संशयितांची नावे हाती

पानसरे खून : आणखी संशयितांची नावे हाती

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 15 2018 11:15PMमुंबई : पीटीआय

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे खूनप्रकरणी आणखी संशयितांची नावे हाती आली असल्याची माहिती सीआयडीतर्फे हायकोर्टात देण्यात आली.  दरम्यान, विचारवंतांच्या हत्येचा छडा लागत नसल्याने हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील विचारवंतांच्या हत्यांचा तातडीने तपास केला गेला पाहिजे. विचारवंतांच्या हत्या होत असल्याने देशाच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले आहे.  न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाने तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येचा अद्याप छडा लागला नाही. तपास यंत्रणांपेक्षा आज गुन्हेगार जास्त हुशारपणे पळवाटा शोधून तपासयंत्रणांना गुंगारा देत आहे, अशी खंतही उच्च न्यायालयाने व्यक्त केली. गोविंद पानसरे खुनाचा तपास करणार्‍या एसआयटीला मोठे यश मिळाल्याची माहीती यावेळी उच्च न्यायालयात देण्यात आली. याप्रकरणी तपास करणार्‍या पाच पथकांच्या हाती काही नवीन संशयितांची लागली आहेत.