Sat, Jan 19, 2019 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आघाडीच्या कंपन्यांशी रिलायन्सचे 25 करार

आघाडीच्या कंपन्यांशी रिलायन्सचे 25 करार

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:26AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मॅग्‍नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये रिलायन्स उद्योगसमूहाने जगभरातील उद्योजकांशी तब्बल 25 सामंजस्य करार केले. येत्या दहा वर्षांत रिलाययन्स स्वत: 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून एक लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने रिलायन्स चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी मुंबईत एका केंद्राची उभारणी करणार आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीबाहेर असलेले हे एकमेव केंद्र असणार आहे. प्रशासन, नवी अ‍ॅप्लीकेशन्स आणि संशोधन यांना या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

मंगळवारी रिलायन्सने सिस्को, सिमेन्स, एचपी, एनव्हिडिया, नोकिया, ईएमसी, कॅनन, सुमिटोमो आदी बड्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले. दिवसभरात 25 करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. नवीन उत्पादनांच्या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी महाराष्ट्राला हे केंद्र पूरक ठरणार आहे. देशातील पहिली ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य गाठण्यातही त्याचा उपयोग होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आर्थिक- तांत्रिक राजधानाी होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.