Mon, May 27, 2019 09:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डी. एस. कुलकर्णींना आणखी 72 तासांचा अल्टिमेटम

डी. एस. कुलकर्णींना आणखी 72 तासांचा अल्टिमेटम

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी 

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास गेले दोन महिने असमर्थ ठरलेले पुण्याचे बांधकाम व्यावसायिक  डी. एस. कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाने आज पुन्हा 72 तासांचा अल्टिमेटम दिला. या तीन दिवसांत पैशांची व्यवस्था करा. आता ही रक्‍कम भरण्यासाठी शेवटची संधी समजा, अशी तंबी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दिली; अन्यथा 25 जानेवारीला जामीन अर्जावर फैसला दिला जाईल, असेही स्पष्ट केले. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने 50 कोटी जमा  करण्यास मुदतवाढ देऊनही ते जमा न करता आल्याने डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.