Sat, Jan 19, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक कोटी भरा, मग मॅरेथॉन घ्या : उच्च न्यायालय

एक कोटी भरा, मग मॅरेथॉन घ्या : उच्च न्यायालय

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 7:38AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई मॅरेथॉनच्या नवाने मोठ्या प्रमाणात देणगी जमा करणार्‍या प्रोकॅम इंटरनॅशनल या आयोजक कंपनीला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. मुंबई महापालिकेने मागणी केलेल्या शुल्कापैकी आधी एक कोटी पाच लाख रुपये जमा करा, त्यानंतर मॅरेथॉन घ्या, असे  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन देशमुख यांनी स्पष्ट केले. आयोजकांनी 15 जानेवारीपर्यंत शुल्काची रक्कम पालिकेकडे जमा करावी त्यानंतर पालिकेने आयोजकांना परवानगी देताना स्पर्धकांना पाणी, एनर्जी ड्रिंक्स पुरवण्यासाठी स्टॉल्स उभारण्याकरिता केलेली  विनंतीही विचारात घ्यावी, असेही स्पष्ट केले.

21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मॅरेथॉन आणि जाहिरात करण्यासाठी मुंबई महापालिकेने 3 कोटी शुल्काची मागणी केली. या शुल्काविरोधात प्रोकॅम इंटरनॅशनलने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली.  त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एम. देशमुख यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने आयोजकांना एक कोटी पाच लाख अनामत रक्कम भरण्याचे आदेश दिले.