Fri, Jul 19, 2019 22:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत जागतिक डिजीटल मीडिया कंटेट हबची क्षमता : शाहरुख

मुंबईत जागतिक डिजीटल मीडिया कंटेट हबची क्षमता : शाहरुख

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:20AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

 महाराष्ट्र हे मनोरंजन आणि माहितीच्या क्षेत्रात देशातील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात कायम यशस्वी ठरले आहे. मात्र, जागतिक स्तरावर आवश्यक दर्जा आणि कंटेड तयार करण्याची क्षमता राज्यात आहे, असे मत सुप्रसिध्द अभिनेते शाहरुख खान यांनी व्यक्त केले.  मॅग्नेटिक महाराष्ट्र कान्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित माहिती आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्य निर्मितीसंदर्भात चर्चासत्रात ही मतं मांडली गेली. यावेळी बोलताना शाहरुख खान म्हणाले की,  मनोरंजन क्षेत्रात आता अमुलाग्र बदल होत असून बदलत्या मागणीनुसार निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती केली पाहिजे.

लोकांना आपल्या सोयीनुसार मनोरंजन हवे आहे. सिने निर्मितीचे नवे आयाम समोर येत आहेत असून राज्यात जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी  अधोरेखित केली. कंटेट निर्मिती ही आता कोणा एकाची मक्तेदारी राहिलेली नसून सर्व स्तरावर कंटेट तयार होत आहेत. मुंबईत जागतिक दर्जाचे डीजीटल मीडिया कंटेट हब बनण्याची क्षमता आहे. हे लक्षात घेऊन येथे ग्राहकाभिमुख डीजीटल हब तयार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी दिली.

क्रिएटीव क्षेत्रातील लोकांनी एकत्रीत येऊन निर्भयपणे काम करण्याची गरज असल्याचे मत अर्नब गोस्वामी यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावरील बातमीदारी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. मोबाईल धारकांची संख्या आणि इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने त्या वर्गाचा विचार लक्षात घेऊन माहिती तयार होण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

वाय कॉम मीडियाचे शुधांशू यांनी प्रादेशिक भाषेतील मनोरंजनाकडे वळण्याची गरज आहे असे सांगितले. सुमारे 300 मिलीयन प्रेक्षक डिजीटल माध्यमांचा उपयोग करत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एक्सेल कम्युनिकेशनचे रितेश सिंघानीया यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणार्‍या सर्व परवानग्या एकत्रित मिळाव्यात अशी मागणी केली.