Wed, Mar 20, 2019 02:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोग्य संचालक डॉ.सतीश पवारांना हटवा

आरोग्य संचालक डॉ.सतीश पवारांना हटवा

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:31AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान संचालक डॉ. सतीश पवार यांना अखेर उच्च न्यायालयाने तातडीने पदावरून हटविण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एमपीएससीने हे पद भरण्यासाठी विलंबाने सुरू केलेली प्रक्रिया बेकायदा ठरविण्याचा मॅटच्या निर्णयावर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. या पदावर तातडीने उमेदवार निवडीची प्रक्रिया एमपीएससीने सुरू करावी. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागातील सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती करून पदभार द्या, असेही आदेशात स्पष्ट केले. डॉ. सतीश पवार यांची नियुक्ती बेकायदा ठरविण्याच्या मॅट आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने फेबु्रवारी 2016 मध्ये शिक्कामोर्तब करून हे पद चार महिन्यांत भरण्याचे आदेश दिले. मात्र एमपीएससीने निवड प्रक्रिया जून 2016 मध्ये सुरू केल्याने पुन्हा  मॅटमध्ये आव्हान देण्यात आले होते.