Thu, Nov 15, 2018 09:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकांतील ग्राहकांच्या ठेवी सरकार परस्पर वापरणार?

बँकांतील ग्राहकांच्या ठेवी सरकार परस्पर वापरणार?

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:37AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

सर्वसामान्यांनी पै पै जमवून बँकेत जमा केलेल्या ठेवी परस्पर वापरण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या विचारात आहे. बँकेत ठेवी ठेवणार्‍या ग्राहकांना सरकार अशा प्रकारे जोराचा धक्का देण्याच्या विचारात आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार असून हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्यांना आपल्याच हक्काची रक्कम देखील गरज भासल्यास वेळेवर मिळणे कठिण होणार आहे. 

फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआयडीआय) या विधेयकाद्वारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या बँकेतील ठेवींवर एक लाख रुपयांपर्यंतचे विम्याचे संरक्षण 1961 च्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन कायद्यानुसार मिळते. मात्र नवीन रचनेमध्ये नेमके किती संरक्षण मिळेल याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. बुडित बँकांना वाचवण्यासाठी ठेवीदारांचीच रक्कम वापरण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार ठेवीदारांना नसून केवळ एफआरडीआय