Sat, Jul 20, 2019 08:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दांपत्याने केले 3 महिन्यांच्या मुलीचे अवयवदान

दांपत्याने केले 3 महिन्यांच्या मुलीचे अवयवदान

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पोटच्या तीन महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी अंत पाहणे नशिबी आलेल्या एका दांपत्याने मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या उमेश सावरकर आणि अश्‍विनी सावरकर यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचा अपघातात जखमी होऊन मृत्यू झाला. ब्रेनडेड झालेल्या आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.      

रविवारी अंगणात प्रवेश करतानाच भरधाव गाडीने सावरकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. उमेश यांना काहीही दुखापत झाली नाही, मात्र पत्नी आणि तीन महिन्यांची मुलगी मीरा हिला गंभीर मार लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मीराला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. मुलीच्या मृत्यूचे दु:ख असतानाच या कुटुंबाने आपल्या चिमुकलीचे अवयव दान करण्याचा निर्णय जड अंत:करणाने घेतला.

सावरकर कुटुंबीयांच्या निर्णयामुळे अवयवदानाप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे. बाळांच्या मृत्यूनंतर सहसा डॉक्टर त्याच्या आई-वडिलांना अवयवदान करण्यास सांगू शकत नाहीत. कारण, आई-वडिलांवरचा आघात मोठा असतो. पण, अशा प्रकारे स्वतःहून जेव्हा काही पालक समोर येतात, तेव्हा तो कित्येक गरजू बाळांसाठी एक आशेचा किरण ठरतो, अशी प्रतिक्रिया मीरावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.