होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तपास यंत्रणेपेक्षा गुन्हेगार हुशार आहेत का

तपास यंत्रणेपेक्षा गुन्हेगार हुशार आहेत का

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:27AMमुंबई : प्रतिपिधी  

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी हे तपास यंत्रणांपेक्षा हुषार आहेत का, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी तपास यंत्रणांना केला. गेले चारवर्षे या प्रकरणाचा तपास करणार्‍या तपासयंत्रणांच्या एक पाऊन पुढे जाऊन हे गुन्हेगार पळवाटा शोधून तपासयंत्रणांना गुंगारा देत आहेत, अशी तीव्र नाराजी न्यायामूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने व्यक्त केली.

तपासयंत्रणा तपास करण्यास अपशयी ठरलेली आहे. विचारवंतांच्या हत्येचा वर्षोनुवर्षे  छडा लागू नये ही भुषणावह गोष्ट नाही. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, याचे भान ठेवा असे खडेबोलही न्यायालयाने तपास यंत्रणांना सुनावले.पानसरे आणि दाभोळकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत़  या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे  यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी एसआयटी आणि सीबीआय या तपासयंत्रणांचा संयुक्त तपास अहवाल  न्यायालयात  सादर केला.

तपासयंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या तपासावर दाभोळकर-पानसरे कुटुंबियांनी बोट ठेवले. गेल्या चार वर्षात आरोपींचा शोध घेण्यास अपयश आले आहे. न्यूयॉर्क टाईम्स, बीबीसीने वृत प्रसारीत केली. त्यावर वर्षानुवर्षे चर्चा घडवून आणल्या जात आहे. आणखी किती चर्चा घडवून आणणार. तपासात कोणतीही प्रगती नाही. ज्या पध्दतीने तपास झाला पाहिजे त्या पध्दतीने होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.