Sun, Jul 21, 2019 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे डब्बेवाले गरजुंची भूक भागवणार

मुंबईचे डब्बेवाले गरजुंची भूक भागवणार

Published On: Jan 21 2018 5:37PM | Last Updated: Jan 21 2018 6:20PMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून मॅनेजमेंटचे विद्यार्थी येत असल्याचे आपण ऐकत असतो. याचबरोबर ते कोणताही सामाजिक उपक्रम असाला तरी आपला सहभाग आनंदाने नोंदवत असतात. असाच एक स्तुत्य उपक्रम आता या डब्‍बेवाल्‍यांनी सुरु केला आहे.

मुंबईमध्ये डब्बेवाल्यांनी रोटी बँक सुरु केली आहे. मुंबई शहरातील हॉटेल, रेस्‍टॉरंन्ट, तसेच घरातही बरेच अन्न उरत असते. हे उरलेले अन्न दररोज वाया जाते. तर या शहरात असे हजारो लोक आहेत ज्यांना अर्धपोटी, उपाशीपोटी झोपावे लागते. त्यामुळे वाया जाणारे अन्न अशा गरजु, भुकेलेल्‍या लोकांना मिळाले तर त्‍यांचा उपाशी पोटी झोपावे लागणार नाही. तसेच अन्नाचा अपव्ययही होणार नाही. या उद्येशाने डब्बेवाल्यांनी रोटी बँक सुरु केली आहे. या विधायक कार्याचा प्रचार त्यांनी मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने केला.

या रोटी बँकसाठी डब्बेवाल्यांनी एक कॉल सेंटरही सुरु केले आहे. इथे कॉल करुन लोक त्‍यांच्याकडील ज्यादा अन्नाची माहिती देऊ शकतात. ते अन्न गोळा करुन गरजुंपर्यंत पोहचवण्याचे काम मुंबईचे डब्बेवाले करणार आहेत. डब्‍बेवाल्‍यांचे टाईम मॅनेजमेंन्ट जगभर प्रसिध्द आहे. या आपल्‍या कौशल्‍याचा वापर ते आता रोटी बँकेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवण्यासाठी करणार आहेत.