Tue, Jul 16, 2019 21:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित

मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित

Published On: Jul 25 2018 3:06PM | Last Updated: Jul 25 2018 3:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यातील अन्य भागात तीव्र अांदोलन सुरू असतानाच मराठी क्रांती मोर्चा समन्वय समितीने मुंबईतील बंद स्थगित करत असल्याचे जाहीर केले. 

औरंगाबाद येथे आंदोलन सुरु असताना काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. त्यानंतर राज्यात अांदोलनाचा वणवा पसरला होता. अाज मुंबईसह ठाणे, सातारा, नगर, सोलापूर या ठिकाणी अांदोलनाला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला. मात्र, अाजचा बंद स्थगित करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकांना सुखरुप घरी जाता यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे समन्वय समितीचे विरेंद्र पवार यांनी सांगितले. तसेच सरकारने आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. आता आरक्षणासाठी आणखी वाट बघायला लावू नये, असेही ते म्हणाले. ही घोषणा मुंबईपुरती असून नवी मुंबईसह ठाण्यातील आंदोलकांनाही बंद स्थगित करण्याची विनंती करणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.