Wed, May 22, 2019 11:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माहिती अधिकार कार्यकर्ताच निघाला खुनाचा मास्टरमाईंड

माहिती अधिकार कार्यकर्ताच निघाला खुनाचा मास्टरमाईंड

Published On: Jan 13 2018 7:39AM | Last Updated: Jan 13 2018 1:15AM

बुकमार्क करा
मुंबई : अवधूत खराडे

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याकांडाप्रकरणी गुन्ह्यातील मास्टर माईंड असलेल्या माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ता अनिल वाघमारे याला अखेर समतानगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. हत्याकांडानंतर आरोपींना पळून जाण्यात मदत करणार्‍या कल्याणमधील विशाल गायकवाड यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पसार साथिदार जगदीश चौधरी आणि अभिराज माने उर्फ ब्लॅकी यांचा शोध सुरू केला आहे. कांदिवलीच्या समतानगरातील सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत हे रविवारी रात्री घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी चॉपरने वार करुन त्यांची निर्घुण हत्या केली. सावंत यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली समतानगर पोलिसांनी शार्पशुटर सोहेल देढीया, रिक्षाचालक गणेश जोगदंड आणि पुण्यातील एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तिघांच्याही चौकशीमध्ये चौधरी, माने आणि वाघमारे यांच्यासह गायकवाडचा सहभाग उघड झाला.