Sun, Nov 18, 2018 18:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : पश्चिम रेल्वे ठप्प, वाहतूक विस्‍कळीत 

मुंबई : पश्चिम रेल्वे ठप्प, वाहतूक विस्‍कळीत 

Published On: Apr 06 2018 1:54AM | Last Updated: Apr 06 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी 

बडोदा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट- विरार मार्गावरील लोकल सेवा रात्री 11.45 वाजल्यानंतर ठप्प झाली. त्यामुळे रात्री उशीरा घरी निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. चर्चगेट येथून रात्री 11.37 वाजता सुटलेली लोकल माहिम ते माटुंगा दरम्यान तब्बल अर्धातास थांबवण्यात आली. त्यामुळे चर्चगेट ते बांद्रा  22 ते 25 मिनिटाचा प्रवास सव्वा तासाने लांबला. विरारसाठी शेवटची जलद लोकल असल्यामुळे या लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या रखडपट्टीचा शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. लोकल रखडल्यामुळे बांद्रा, अंधेरी, बोरीवली स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली होती.

Tags : Mumbai, Western Railway,