Thu, Jul 18, 2019 08:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत वाहन अपघातातील मृत्यू 5 टक्क्यांनी वाढले

मुंबईत वाहन अपघातातील मृत्यू 5 टक्क्यांनी वाढले

Published On: Feb 21 2018 2:06AM | Last Updated: Feb 21 2018 2:06AMमुंबई : वार्ताहर 

मुंबई शहरामध्ये 2016 च्या  तुलनेत 2017 मध्ये रस्ते वाहन अपघातात मृत्यूचे प्रमाण 5 टक्क्यांनी वाढल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. मुंबईसारख्या शहरात अपघाताची व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.   मानखुर्द भागात राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे 1 जानेवारी 2017 पासून डिसेंबर 2017 पर्यंत मुंबईतील  रस्ते, वाहने अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला,  खराब रस्ते, खड्डे आणि चुकीच्या नियमांमुळे किती जणांचे बळी गेल,  त्यावर प्रशासनाने काय कारवाई किंवा बदल केले आहे  याबाबत माहिती विचारली होती. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते, रस्ते वाहने अपघातात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या खराब रचना व खड्ड्यांमुळे होतात. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना  पत्र पाठवून उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.