होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाची 100 कोटींची एफडी मोडली

मुंबई विद्यापीठाची 100 कोटींची एफडी मोडली

Published On: Feb 03 2018 2:18AM | Last Updated: Feb 03 2018 2:16AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या विकासकामाच्या नावावर मुंबई विद्यापीठाची सुमारे 100 ते 125 कोटी रुपयांची एफडी मोडणार्‍या माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रोग्रेसीव्ह  स्टूडंट मुव्हमेंटचे अध्यक्ष  नितीन माने  यांनी केली आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठामध्ये भ्रष्ट व ढिसाळ कारभार चालू आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले असून अजून परिस्थिती बदललेली नाही. राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात तक्रार करुनही त्यांनी संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.  गेल्या दोन महीन्यांपासून पत्रव्यवहार करण्यात आला, परंतू कोणीही दखल घेतली नाही, असे नितीन माने यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ कलिना येथे 23 ते 26 जानेवारी बेमुदत उपोषणदेखिल केले गेले  त्यावेळी लेखी आश्वासन देण्यात आले. पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. माजी कुलगुरू देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, न्यायालयीन चौकशी तसेच विद्यार्थांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घेराव आंदोलन व काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करून जाब विचारणार आहोत, असे माने यांनी सांगितले. 

सदर घेराव घालण्या करीता शिवसेना व भाजपा शिक्षक संघटना सोडून नॅशनल स्टुडंन्ट युनियन ऑफ इंडिया,  राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी संघटना,  प्रहार विद्यार्थी संघटना, आदी संघटनांनी पाठींबा दिला आहे.