Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ प्राध्यापक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुंबई विद्यापीठ प्राध्यापक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. प्राध्यापक मतदार संघाची निवडणुक येत्या 16 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम येत्या 18 फेब्रुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पहिल्या टप्यात कॉलेज प्राचार्य, कॉलेज मॅनेजमेंट आणि विद्यापीठ अध्यापक या प्रवर्गातील निवडणूका पार पडल्या आहेत. कॉलेज प्राध्यापक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार संख्या मोठी आहे. हे लक्षात घेवून आता दुसर्‍या टप्यात प्राध्यापक मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीची अधिसूचना आणि निवडणुक कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.