Tue, Nov 13, 2018 09:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलगुरुपदासाठी रस्सीखेच 

कुलगुरुपदासाठी रस्सीखेच 

Published On: Mar 01 2018 2:04AM | Last Updated: Mar 01 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी शोध समितीकडे अर्ज केलेल्या  110 अर्जांपैकी 64 अर्ज पात्र ठरले असून अंतिम मुलाखती झाल्यानंतर लवकरच विद्यापीठाला कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. निकाल गोंधळाला कारणीभूत असलेल्या माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू पदावरून दूर केल्यानंतर राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठीत केली होती. या समितीकडे 102 जणांनी अर्ज केले होते. त्या अर्जांची छाननी होवून अंतिम 64 जणांचे अर्ज पात्र झाल्याची माहिती सूत्राकडून कळते. यामध्ये विद्यापीठांतील सलग्‍न महाविद्यालयातील अनेक प्राचार्यांचा समावेश आहे.