Sat, Feb 23, 2019 15:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : एक्स्प्रेसमध्ये दोन जुळ्या मुलींना दिला जन्म

मुंबई : धावत्या रेल्वेत दिला जुळ्या मुलींना जन्म

Published On: Jul 15 2018 1:38PM | Last Updated: Jul 15 2018 1:46PMठाणे : प्रतिनिधी

मुंबई येथून पहाटे निघालेली विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधील डब्यात एका मातेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली आहे. घाटकोपर येथे राहणारी सलमा तब्बसुम शेख (वय३०) असे या मातेचे नाव असून दोन्ही जुळी मूल सुखरूप आहेत.

मुंबई वरून निघालेली विशाखा पट्टानम एक्स्प्रेस आज सकाळी ७.५२ वाजताच्या सुमारास कल्याण स्थानकावर येताच या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबत तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर थोड्या वेळातच या टएक्स्प्रेसच्या डब्यात महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला.

 यावेळी रेल्वे कर्मचारी नीलम गुप्ता, सुरेखा कदम यांनी तिची मदत केली. त्यानंतर कल्याण स्थानकातील रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने या मातेची आणि बाळाची तपासणी केली. प्रसुतीनंतर या तिघांचीही प्रकृती उत्तम असून या घटने दरम्यान 35 मिनिटे विशाखापट्टणम एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर थांबली होती. प्रसुतीनंतर या महिलेला पुढील उपचारांसाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे