Mon, Jun 17, 2019 02:34



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गडकरींचे राज ठाकरेंना 25 पानाचे पत्र...

गडकरींचे राज ठाकरेंना 25 पानाचे पत्र...

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:51AM



मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे साबणाचे फुगे उडविल्याप्रमाणे विकासकामांसाठी कोटींच्या कोटी निधी जाहीर करतात, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तर पाठवले.  गडकरी यांनी जाहीर केलेले प्रकल्प व त्याच्या आकडेवारीसह कागदपत्रेच राज यांना पाठविली आहेत.

 महाराष्ट्रात आतापर्यंत कुठे आणि किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला,  किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती गडकरी यांनी 25 पानांत दिली आहे. महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी 2 लाख 82 हजार कोटी, बंदर विकासासाठी 70 हजार कोटी तसेच सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचे गडकरींनी या पत्रात नमुद केले आहे. 

गडकरी कुठेही गेले की 1 लाख कोटी, 2 लाख कोटी साबणाच्या फुग्याप्रमाणे फु करतात.  शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात. कामे करत नाही, असा आरोप करत राज यांनी टाळ्या मिळविल्या होत्या. गडकरी यांनी त्वरीत लेखी उत्तर पाठवुन विकासकामे व खर्चाची माहिती राज ठाकरे यांना दिली आहे. अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.

Tags : Mumbai,news,transport Minister Nitin Gadkari letter