Fri, May 24, 2019 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-ठाण्याचे तापमान घटले

मुंबई-ठाण्याचे तापमान घटले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच अचानकपणे पारा 41अंशावर गेल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई-ठाणेकरांना आता दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमानात 34 अंशावर उतरले तर ठाण्यातही कमाल तापमान 36.6 तर किमान 23.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

गेल्या रविवारी मुंबईतील मार्चमधील सांताक्रू्रझ येथील तापमान 41 अंश नोंदवले गेले होते. बुधवारी मात्र दिवसभरात  कमाल तापमानात 34 अंश सेल्सियसची नोंद झाली. ठाणे शहरात 24 मार्चपासून तापमानात अचानक 40 ते 44 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली. मात्र बुधवारी तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस इतकी घसरण झाल्याने ठाणेकरांना थोडा दिलासा मिळाला. ठाण्यात बुधवारी कमाल तापमान 36.6 तर किमान 23.6 अंश सेल्यियस नोंदविले गेल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. 


  •