Tue, May 21, 2019 00:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई टॉक्स : अनेक भाषांच्या दडपणात जगतेय मुंबई 

मुंबई टॉक्स : अनेक भाषांच्या दडपणात जगतेय मुंबई 

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी 

स्थलांतरामुळे मुंबई शहरांच्या ताण वाढला आहे. मुंबईत येणार्‍या बहुभाषिक स्थलांतरामुळे राजकीय पक्षांचा भाषांमुळे होणारा दवावगट, मराठी माणसामधील असुरक्षिततेची भावना, हिंदी- मराठी भाषावाद अशा अनेक विषयांच्या दडपणात वर्षानुवर्षे जीवन जगत असल्याचा सूर मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या मुंबई टॉक्स या परिषदेच्या दुसर्‍या दिवशी उमटला. विद्यापीठाच्या कलिना संकुलात फिरोजशहा मेहता सभागृहात झालेल्या मुंबई टॉक्स या परिषदेच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात मुंबईत होणारी स्थलांतरे या विषयाने झाली.

पहिल्या सत्रात अनेक मान्यवारांनी विविध भाषिक नागरिकांच्या स्थलांतराबाबची चर्चा रंगली. ईशान्येकडील राज्यातून, दाक्षिणात्य राज्यांमधून आणि उत्तर भारतातील राज्यातून मुंबई मध्ये होणारी स्थलांतरे यावर लक्ष वेधले गेले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे होत्या. मुंबईचे बदलत जाणार्‍या स्थितीकडे लक्ष त्यांनी वेधले. डॉ. हेमाली संघवी यांनी जैन स्थलांतरे आणि मुंबईची अर्थव्यवस्था यावर विचार मांडले. मुंबईतील जैन समाज, त्यांचे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यापारावर असलेले वर्चस्व आणि त्याचा मुंबईवर झालेला परिणाम याकडे लक्ष वेधले.