Thu, May 23, 2019 14:43
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारचे संकेतस्थळ क्रॅश

राज्य सरकारचे संकेतस्थळ क्रॅश

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:39AMमुंबई  : विशेष प्रतिनिधी 

राज्यातील जनतेची कामे जलदगतीने व्हावीत तसेच सरकारी कामाची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होण्यासाठी सरकारने तयार केलेले संकेतस्थळ अचानक क्रॅश झाले. याचा सर्वाधिक फटका महसूल विभागाला बसला. राज्य सरकारचे संकेतस्थळ बंद अथवा क्रॅश होऊ नये यासाठी आयटी विभाग दक्ष असतो. मात्र शुक्रवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास हे संकेतस्थळ ओपन होण्यास वेळ लागू लागला.

अधिकारी व कर्मचार्‍यांनी अनेकदा प्रयत्न केले, अखेरीस ही वेबसाईटच क्रॅश झाल्याचा मेसेज संकेतस्थळावर येऊ लागला.  त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणार्‍या लाखो नागरिकांचीही  अडचण झाली. राज्य सरकारच्या जवळपास 36 विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी तीन विभागांची माहिती सातत्याने संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. या संकेतस्थळामध्येच इतर विभागांच्याही वेबसाईटच्या लिंक जोडण्यात आल्या आहेत. संकेतस्थळ क्रॅश झाल्याचा फटका मंत्रालयातील इतर कामांनाही  बसला होता.