Tue, Mar 19, 2019 09:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-शिर्डी विमानाचा अपघात टळला

मुंबई-शिर्डी विमानाचा अपघात टळला

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईहून निघालेले एयर अलायन्सचे विमान शिर्डी विमानतळावर लँडींग होताना रन-वे ओलांडून 100 फुटांपर्यंत पुढे सरकले. सुदैवाने सर्वच्या सर्व 42 प्रवासी सुखरूप बचावले. 

सोमवारी सायंकाळी 4.50 वा. विमान धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान रन वेऐवजी रेखा एरियात घुसले. सुदैवाने 100 फुटांवरच विमान थांबले आणि प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात आले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून एअर पोर्ट आॉथोरिटी ऑफ इंडियाने याबाबतचा अहवाल मागविला आहे. साई भक्तांसाठी शिर्डी विमानतळावरून शिर्डी -मुंबई व शिर्डी -हैद्राबाद अशा दोन विमानसेवा गतवर्षी 1 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानसेवेचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून नोंद घ्यावी असा हा पहिलाच प्रकार होय. 

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्स या कंपनीची व्हीटीआर 72 या प्रकारातील विमाने या मार्गावरून धावतात.