Tue, May 21, 2019 12:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दंगल गर्ल झायराची छेड काढणाऱ्याला अटक

दंगल गर्ल झायराची छेड काढणाऱ्याला अटक

Published On: Dec 11 2017 7:49AM | Last Updated: Dec 11 2017 7:49AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दंगल गर्ल झायरा वसीम हिच्याशी विमानात असभ्य वर्तन करणाऱ्याला सहार पोलिसानी अटक केली. विकास सचदेव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिल्ली ते मुंबई विमन प्रवास करत असताना विमानात झायराने छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.  झायराने छेडछाड झाल्याचे इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन सांगितले होते.

या घटनेची माहिती झायरा विस्तारा एयरलाईन्सलाही दिली होती. मात्र त्यावेळी तिच्या मदतीला कोणताही कर्मचारी किंवा प्रवाशी तेथे आला नाही. तिने या प्रकाराचे चित्रण करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. संबंधिताविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंध कलमांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला. महिला आयोगाने देखील या घटनेची दखल घेत विस्तारा एयरलाईन्सला नोटीस पाठवून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत

सचदेवला विमान प्रवासाला बंदी
झायराच्या छेडछाड प्रकरणाची नागरी हवाई वाहतूकमंत्री जयंत सिन्हा यांनी दखल घेतली असून विकास सचदेवला विमान प्रवासास बंदी (नो फ्लाईंग लिस्ट) घालण्यात आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून आम्ही झायराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.’ ‘नो फ्लाय लिस्ट’ नियमानुसार त्या व्यक्‍तीला तीन महिने किंवा आजीवन देशांतर्गत विमानप्रवास करता येत नाही. 

वाचा : दंगल गर्ल झायराबरोबर विमानात असभ्य वर्तन (व्हिडिओ)