होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल प्रकरण: आरोपींची माहिती देणार्‍यास लाखाचे बक्षीस

कमला मिल प्रकरण: आरोपींची माहिती देणार्‍यास लाखाचे बक्षीस

Published On: Jan 05 2018 9:54PM | Last Updated: Jan 05 2018 9:54PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

गत वर्षाच्या अखेरीस मुंबईला हादरवून सोडणार्‍या कमला मिल आग प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींची माहिती देणार्‍यास मुंबई पोलिसांनी १ लाखाच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. या अग्‍नितांडवात १४ जणांचा बळी गेला होता, तर ३० हून अधिकजण जखमी झाले होते. 

२९ डिसेंबरला ना. म. जोशी मार्ग परिसरातील कमला मिलला आग लागली होती. यामध्ये हॉटेल मालकाला दोषी ठरवत वन अबाव्‍हच्या मालकाला दोषी ठरवून गुन्‍हा नोंदविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर मालक क्रिपेश मनसुखलाल संघवी, जिगर मनसुखलाल संघवी आणि अभिजित अशोक मानकर हे तिघे फरार झाले आहेत. 

या प्रकरणी फरार आरोपींची माहिती देणार्‍यास मुंबई पोलिसांनी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.