Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, रंगल्या राजकीय चर्चा?

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, रंगल्या राजकीय चर्चा?

Published On: Mar 17 2018 1:17PM | Last Updated: Mar 17 2018 1:20PMमुंबर्इ : पुढारी ऑनलाईन 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या एक दिवस आधी ही भेट झाल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातहृ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अलिकडेच घेतलेली मुलाखत आणि यामुळे या दोन नेत्यांची झालेली जवळीक हा चर्चेचा विषय झाला होता. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच, राज ठाकरे आज सकाळी पवार यांच्या पेडर रोडवरील निवासस्थानी जावून पवार यांच्याशी चर्चा केली.

उद्या शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत.  शरद पवार यांच्या भेटी संदर्भात उद्याच्या मेळाव्यात भाष्य करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

दबक्या आवाजात चर्चा

२०१९ च्या लोकसभा निवडणणुकीआधी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न  सुरू आहे. याचाच एक भाग म्हणूण  आंध्र प्रदेशममधील टीडीपीने मोदी सरकारच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाला सर्व विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.  तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आयोजित ‘डिनर डिप्लोमॅसी’द्वारे विरोधकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींच्या विरोधात टीका करणाऱ्या राज ठाकरे यांना देखील या विरोधकांच्या गटात सामील करून घेण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Tags : Raj Thakrey, Sharad Pawar, MNS, NCP, Mumbai, Politics,NDA,BJP,TDP