Sun, Mar 24, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांना पश्चाताप होतोय; ४० वर्षांपूर्वीच्या केली 'ही' चूक!

शरद पवारांना पश्चाताप होतोय; ४० वर्षांपूर्वीच्या केली 'ही' चूक!

Published On: Mar 19 2018 12:46PM | Last Updated: Mar 19 2018 12:46PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

तरूण वयात तंबाखू आणि सुपारीचे सेवन लागल्याचा आज मला पश्चाताप होतोय. ४० वर्षांपूर्वी कोणीतरी मला ही व्यसने करण्यापासून रोखले असते तर बरे झाले असते, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. इंडियन डेंटल असोसिएशन आयोजित कर्करोग निवारण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

शरद पवार यांना तोंडाचा कर्करोग झाला आहे. त्याच्यावर ते उपचार ही घेत आहेत. याविषयी बोलताना, तोंडाला झालेला कर्करोग आणि दात काढून टाकल्यामुळे मला त्रास झाला. यामुळे मला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. तोंड उघडणे, जेवण गिळणे आणि बोलण्यात सुद्धा मला अडचणी येत होत्या, असे त्यांनी सांगितले. 

इंडियन डेंटल असोसिएशनने तोंडाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगाचा समुळ नायनाट करायचा असा निर्धार यावेळी करण्यात आला.  शरद पवार यांनी संस्थेच्या विविध मोहिमांची माहिती घेऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

लाखो भारतीय तोंडाच्या कर्करोगाच्या समस्येमध्ये अडकत आहेत. या आजारामुळे त्यांना अनेक मरण यातना सहन कराव्या लागतात याचे मला दु:ख आहे. हा मुद्दा मी संसदेत मांडणार असल्याचेही ते म्हणाले. 

Tags : NCP, Sharad Pawar, Mouth Cancer, Tabaco, Oral Health Day