Sat, Feb 16, 2019 03:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी

मुंबई पालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी

Published On: Mar 15 2018 1:31AM | Last Updated: Mar 15 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगर पालिकेने सफाई कामगारांच्या 1388 जागांसाठी केलेल्या भरतीत बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना नोकर्‍या मिळू नयेत म्हणून परिक्षेच्या पेपरची रचना केल्याचे दिसून येत आहे. सफाई कामगाराच्या भरतीसाठी अत्यंत कठीण प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत केले आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले.

सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?, 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?, गायनेशियम म्हणजे काय?, लोणच्यामध्ये उपयोगात येणार्‍या विनेगरमध्ये काय असते? असे प्रश्‍न विचारण्यात आले होते. हे प्रश्‍न सफाई कामगारांच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या क्षमतेच्या वाहेरचे असून यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गिरकर यांनी केली. विनायक मेटे व अन्य सदस्यांनी हा प्रकार गंभीर असून याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली.