Tue, Nov 20, 2018 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे हाल

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे हाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा या मेट्रो-१ मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचा दरवाजा उघडा राहिल्याने गुरुवारी तांत्रिक बिघाड झाला. घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मेट्रोचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर उतरवण्यात आले. 

या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोच्या वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सध्या अंधेरी आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या मेट्रोची वाहतूक सुरू असली तरी मेट्रो खूप विलंबाने धावत आहेत. या मार्गावर तांत्रिक बिघाड झाला असून लवकरच याबाबत माहिती देण्यात येईल, असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

Tags : Munbai, Metro, Traffic, Technical Falt, Service,disrupt, Local, Varsova Highway Station


  •