Wed, Nov 14, 2018 05:55



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद 

आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद 

Published On: Jan 03 2018 3:06PM | Last Updated: Jan 03 2018 3:06PM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-१ मार्गालाही बंदचा फटका बसला आहे. आंदोलकांच्या आंदोलनानंतर घाटकोपर ते एअरपोर्ट रोड या मार्गावरील मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मेट्रो रेल्वे सुद्धा घाटकोपर मेट्रो स्थानकावर जाऊन रोखली. यानंतर मुंबई मेट्रोने सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत आपली सेवा बंद केली आहे. तर एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत मात्र मेट्रोची सेवा सुरू आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.

आंदोलक असल्फा मेट्रो स्टेशनवरही घोषणाबाजी करत रुळावर उतरले. यामुळे ही मेट्रो जवळपास दहा मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो रोखल्याने अनेक प्रवासी यात अडकले होते. मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे मेट्रो रोखली गेली आहे.

संबंधित बातम्या : 

भीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद

जिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द

महाराष्ट्र बंद (Live Updates)