Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी 

रविवारी रेल्वेच्या मध्य रेल्वे ( मेन मार्ग ), मध्य रेल्वे ( हार्बर मार्ग), पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. घराबाहेर निघताना लोकलचे वेळापत्रक बघूनच घरबाहेर निघावे लागणार आहे.  मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण ते दिवा अप जलदगती या दरम्यान  सकाळी 11.15 ते सायं. 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळी कल्याण ते दिवा अप जलदगती मार्गावरील लोकल अप धीम्या गतीच्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी  11.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-बेलापूर मार्गावर धावणारी लोकल सेवा ब्लॉक काळात खंडित असणार आहे. सीएसएमटी ते नेरूळदरम्यान लोकल धावणार असून अंधेरी-पनवेल लोकलसेवा ब्लॉक काळात रद्द करण्यात आल्या आहेत. 

तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीमा गती मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी  10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.