Sun, Mar 24, 2019 23:35
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मुंबई मॅरेथॉनने मला दिलं नवीन आयुष्य’

‘मुंबई मॅरेथॉनने मला दिलं नवीन आयुष्य’

Published On: Jan 21 2018 11:00AM | Last Updated: Jan 21 2018 10:59AMमुंबई : प्रतिनिधी

‘व्हिलचेअर म्हणजे आयुष्य संपलं नाही, मुंबई मॅरेथॉनने मला जगण्याची नवी उमेद दिलीये. मुंबई मॅरेथॉनने मला नवं आयुष्य दिलंय.’ हे शब्द आहेत, विद्या कदम यांचे. मुंबई मॅरेथॉनमध्ये विद्या कदम यांनीदेखील सहभाग घेतला होता. विद्या यांना चालता येत नाही, त्या व्हिलचेअरवर असतात. पण, गेल्या दोन वर्षांपासून साताऱ्याहून स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आवर्जुन मुंबईत येतात. २०१२साली झालेल्या अपघातामुळे विद्या यांना त्यांचे पाय गमवावे लागले. पण, मुंबई मॅरेथॉनने त्यांना नवी उमेद दिली.

विद्या कदम म्हणतात, “अपघातानंतर मी पूर्णत: खचून गेले होते. काम करता येत नसल्याने हतबल झाले होते. भावाने माझ्यासारखे अनेक लोक मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतात हे मला सांगितलं. त्यामुळे २०१६मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत सहभाग घेतला. खूप छान वाटलं. माझ्यासारखे अनेक लोकं होते. अपंग असतानाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जगण्याची नवी उमेद दिसली. त्यांना पाहून जगण्याची नवीन आशा मिळाली. त्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेते.”

मुंबई मॅरेथॉन स्पर्घेत भाग घेऊन, लोकांपर्यंत आपला एक संदेश पोहोचवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. या स्पर्घेत भाग घेण्यासाठी विद्या कदम दरवर्षी मुंबईत येतात. विद्या अपंग आहेत. त्यांना चालता येत नाही. पण, व्हिलचेअर म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, असा संदेश विद्या यांनी मॅरेथॉनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.