Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाचं वर्चस्‍व(video)

मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाचं वर्चस्‍व (video)

Published On: Jan 21 2018 9:27AM | Last Updated: Jan 21 2018 10:51AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्‍व राहिले आहे. पुरुष गटाच्या मॅरेथॉन स्‍पर्धेचा सॉलोमन डिकसिसा विजेता ठरला असून त्याने मॅरेथॉनचे अंतर २ तास ९ मिनिटे आणि ३३ सेकंदात पूर्ण केले. तर महिला मॅरेथॉनही इथिओपियाच्याच अमानी गोबेना हिने जिंकले आहे. भारतीय पुरुष गटात गोपी थोनाकल विजेता ठरला असून नरेंद्रसिंह रावत उपविजेता ठरला आहे. तर भारतीय महिलांमध्ये सुधा सिंग हिने मॅरेथॉन जिंकली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेकांचा समावेश असलेल्या मुंबई मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मुंबईकरानी दिला. सकाळी ५ वाजुन ४० मिनिटांनी सुरू झालेल्या हौशी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. त्यांनतर हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. सर्वांचे आकर्षण असलेल्या एलिट मॅरेथॉनचा थरार सुरू असून आफ्रिकन धावपटू यंदाही आपले वर्चस्व अबाधित राखण्याची शक्यता आहे.सामाजिक संदेश देण्यासाठी मुंबईची फेव्हरेट असलेल्या ड्रीम रनमध्ये १८,५०० उत्साही स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. धावपटूंना धावत असताना कोणताही त्रास होऊ नये याकरता दक्षता घेण्यात आली आहे. ज्यूस, पाणी आणि स्प्रे यांचे ठिकठिकाणी काऊंटर उभारण्यात आले आहेत. अनेक कुटुंबांनी देखील एकत्रितपनणे सहभाग नोंदवताना दिसत आहे. मुंबई कधी झोपत नाही असे म्हणतात. या मॅरेथॉनच्या माध्यमातून मुंबईकरांचे स्पिरिट पुन्हा पाहण्यास मिळत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा धावपटूंना पाठिंबा

गिरगाव चौपाटी ते थेट ट्रायडन्ट हॉटेलपर्यंत सगळीकडे धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जण गाणी गाताना दिसत आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील मुले मुली देखील रस्त्याचा दुतर्फा धावपटूंना पाठिंबा देताना दिसत आहे.

मुंबई मॅरेथॉन

पूर्ण मॅरेथॉन - पुरुष
१. सोलोमोन देकसीसा (इथिओपिया)२:०९:३४
२. सुमेत अकालनौ (इथिओपिया)२:१०:००
३. जोशुआ किपकोरीर (केनिया)  २:१०:३०

महिला मॅरेथॉन : 
१. अमाने गोबेना(इथिओपिया) २:२५:४९
२. बोर्नेस कितूर (केनिया) २:२८:४८
३. शुको गेनेमो (इथिओपिया)२:२९:४१

मुंबई मॅरेथॉन भारतीय गट 

पुरूष मॅरेथॉन :
१. गोपी थोनाकल २:१६:५१
२. नतितेंदरसिंग रावत २:१६:५४
३. श्रीनू बुगाथा २:२३:५६

महिला मॅरेथॉन: 
१. सुधा सिंग २:४८:३२
२. ज्योती गवते २:५०:४७
३.पारूल चौधरी २:५३:२६