Mon, Apr 22, 2019 03:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई मॅरेथॉन: अवयवदानासाठी मायलेकींची 'लक्षवेधी' धाव

मुंबई मॅरेथॉन: अवयवदानासाठी मायलेकींची 'धाव'

Published On: Jan 21 2018 10:53AM | Last Updated: Jan 21 2018 11:13AMमुंबई :  पुढारी ऑनलाईन 

मुंबई मॅरेथॉनमध्ये जळगावच्या कासलीवाल कुटुंबियांनी अवयवदानाचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जळगावचे संदीप कासलीवाल यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. अवयवदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांमध्ये अवयव प्रत्यारोपणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी कासलीवाल कुटुंबियांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन कासलीवाल कुटुंबीयांनी अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न केला.

महाराष्ट्रातील जळगावमध्ये राहणाऱ्या संदीप कासलीवाल यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. संदीप यांना त्यांची पत्नी मधु यांनी आपल्या यकृताचा काही भाग दिला. मधु कासलीवाल म्हणतात, “संदीप यांना मॅरेथॉनमध्ये धावण्याची खूप इच्छा होती. पण, प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्यांना धावण्याची परवानगी दिली नाही. लोकांमध्ये अवयवदानासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी, हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन अवयवदान करावे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून  करतो आहे.”

मधु कासलीवाल पुढे म्हणाल्या, “मी ऑर्गन डोनर असल्याचा अभिमान आहे. अवयवदान काळाची गरज आहे. यासाठी आम्ही 'प्राऊड टू बी ऑर्गन डोनर' असा फलक हातात घेऊन मुंबई मॅरेथॉन धावलो. संदीप यांच्या जागी माझी मुलगी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली.” मधु यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्याने कासलीवाल कुटुंब गेले काही दिवस मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबईत सराव करत होते.