Thu, Nov 15, 2018 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलसेवा विस्कळीत; पुर्ववत होण्यास मध्यरात्र होणार

लोकलसेवा विस्कळीत; पुर्ववत होण्यास मध्यरात्र होणार

Published On: Jul 03 2018 1:27PM | Last Updated: Jul 03 2018 1:27PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पश्चिम रेल्वेचच्या अंधेरी स्थानकाजवळ पादचारी पूलाचा भाग रुळावर कोसळल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे. रुळावरील मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे यात अडथळा येत असल्याने लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गाला जोडणारी लोकलसेवा दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होईल. 

प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गाला जोडणारी लोकलसेवा दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होईल. तर पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन जलदगती मार्गावरील लोकलसेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन स्लो मार्गाची सेवा मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्विटरद्वारे पश्चिम रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.