होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज नाही : मुख्यमंत्री

कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज नाही : मुख्यमंत्री

Published On: Feb 08 2018 6:07PM | Last Updated: Feb 08 2018 6:11PM



                                                                      
                                                                                                      - 
मुबंई  : प्रतिनिधी

शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेतर्गत मंजुर कर्जखात्यांवर बॅकानी 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारणी करू नये असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज सर्व बॅकांना दिले.

 मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की यापुर्वी राज्यस्तरीय बॅकर्स समीतीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. तरी देखील जुलै 2017 कर्ज खात्यांवर काही बॅका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे  बॅकानी अशी व्याजआकारणी  करू नये व असे केल्यास बॅकावर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेचा जिल्हा निहाय व बॅक निहाय आढावा यावेळी त्यांनी घेतला.

कर्जमाफी योजनेतर्गत एकुण 31.32 लाख कर्ज खात्यांवर 12 हजार तीनशे कोटी एवढी रक्कम संबंधीत कर्जखात्यांत वर्ग करण्यात आली आहे. तथापी शेतकऱ्यांनी अर्जात दिलेली माहिती व बॅकेकडील माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती संबंधीत बॅकाकडे पाठविण्यात आली आहे.

 21.65 लाख खात्यापैकी 13.35 लाख खात्यांची माहिती बॅकानी अपलोड केली आहे .उर्वरीत कर्जखात्यांची माहिती पुढील तीन दिवसात सर्व जिल्हा बॅका,राष्ट्रीयकृत बॅका,व्यावसायीक बॅकानी पोर्टलवर टाकावी. उर्वरीत टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यावर जमा होण्यासाठी बॅक व तालुकास्तरीय समीत्यांनी जलदगतीने व अचुक काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्यासह मुख्य सचिव सुमित मल्लीक , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी ,अप्पर मुख्य सचिव सहकार एस.एस.संधू यासह सर्व राष्ट्रीयकृत बॅकेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्ह‍िडीओ कॉन्फरन्समध्ये सोलापूरवरून सहभाग घेतला.

एकरकमी परतफेड योजना  (ओटीएस )चा लाभ मिळण्यासाठी  बॅकांनी विशेष मोहिम राबवुन शेतक-यांना थकबाकीची उर्वरीत रक्कम भरण्यास प्रोत्साहीत करावे जेणेकरून त्यांना दिड लाख पर्यतची कर्जमाफीचा लाभ देता येईल अशीही सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.