Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई:क्रिस्‍टल टॉवरमध्ये आग, चौघांचा मृत्यू

मुंबई:क्रिस्‍टल टॉवरमध्ये आग, चौघांचा मृत्यू

Published On: Aug 22 2018 9:50AM | Last Updated: Aug 22 2018 12:13PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील आगीच्या घटना काही केल्‍या थांबायचे नाव घेत नाहीत. आज (दि. २२ ऑगस्‍ट) सकाळी साडे आठ वाजता परळ भागातील क्रिस्‍टल टॉवरच्या १२ व्या मजल्‍यावर भीषण आग लागली. अग्‍निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच अग्‍निशमनदलाच्या वीस गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्‍निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्‍न करत आहेत. या आगीत चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोघांची नावे बबलु शेख (वय ३६), शुभदा शिर्के वय ६२) अशी असून इतर दोन जणांची ओळख अद्याप पटली नाही. श्वास गुदमरल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मृतांमध्ये तीन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. बबलू शेख आणि शुभदा शेळके अशी मृतांमधील दोघांची नावे आहेत.  मिळालेल्‍या माहितीनुसार, हिंदमाता परिसरात असलेली ही इमारत १४ मजली असून यात शंभरहून अधिक लोक रहात होते. यातील २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्‍याची माहिती स्‍थानिकांनी दिली आहे. 

अग्निशमन दलाने केलेले काम कौतुकास्पद आहे. चार जण दगावले आहेत, त्यांना मदत मिळेलच पण जखमींना चांगले उपचार मिळण्यासाठी मी केईएमच्या डीनशी बोललो आहे. तसेच इमारतीच्या विकासकाडून नियम पाळले गेले नसतील तर त्याची चौकशी करून कडक कारवाई केली जाणार आहे. असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले

दरम्‍यान, या इमारतीत  कोणतीही अग्‍निरोधक यंत्रणा नल्‍याचे कंत्राटदारच या घटनेला जबाबदार असल्‍याचे रहिवाशांचे म्‍हणणे आहे.