Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोल्ड जिम चालवणाऱ्यास अपहरण, बलात्कारप्रकरणी अटक

गोल्ड जिम चालवणाऱ्यास अपहरण, बलात्कारप्रकरणी अटक

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 3:37PM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी

पुण्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोल्ड जिमचा मालक शकील शकूर याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अपहरण आणि बलात्काराच्या याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या शकीलचा ताबा पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात याच महिलेने अन्य एक तक्रार केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले. 

पीडित महिला ही मूळची पुण्याची रहिवासी आहे. सात वर्षांपूर्वी तिची शकील शकूर याच्याशी ओळख झाली होती. शकील हा गोल्ड जिमचा मालक आहे. ही महिला शकीलकडे कामासाठी गेली होती. काम देण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण केली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच दरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचारकरताना प्रसंगी तो तिला पिस्तूलचा धाक दाखवित होता. अनेकदा तिने त्याचा विरोध करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो तिला धमकी देत होता. इतकेच नव्हे तर पिडीत महिलेसह तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई आणि पुणे शहरात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने विलेपार्ले पोलीस ठाण्यात शकीलविरुद्ध अपहरण आणि बलात्काराची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर शकीलला पोलिसांनी अटक केली होती. 

याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्याविरुद्ध पिडीत महिलेने पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यातही एक तक्रार केली आहे. या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या शकीलचा ताबा आता पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले. प्राथमिक तपासात पिडीत महिलेला शकीलने दुबई येथे नेले होते. तिथे गेल्यानंतर तिचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला. तिने त्यास नकार दिला होता.