Fri, Aug 23, 2019 21:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हायकोर्टातील नोकरभरती वादाच्या भोवर्‍यात

हायकोर्टातील नोकरभरती वादाच्या भोवर्‍यात

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 2:02AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नोकरभरतीत अंध आणि अपंग उमेदवारांसाठी राखीव जागा नसल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या नोकरभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्टेनो, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील सुमारे 8 हजार 921 पदे अडचणीत आली आहेत. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

नवीन अर्ज स्वीकारण्यास मनाई करताना स्थगिती आदेश वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचे निर्देशही हायकोर्ट व्यवस्थापनाला दिले. : अ‍ॅड. उदय वारुंजिकर आणि अ‍ॅड. सुमित काटे यांनी भरती प्रक्रियेलाच आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  हायकोर्टाच्या स्टेनो, कनिष्ठ लिपिक , शिपाई/हमाल या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सुमारे 8 हजार 921 पदांसाठी 28 मार्च 2018 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.

10 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज  मागिविण्यात आले. परंतू या नोकरभरतीत अपंगांसाठी कायद्याने 2 टक्के राखीव कोटा ठेवण्याचे बंधन असताना तो ठेवण्यात आला नसल्याने या नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी विनंती यावेळी अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी केली. यची दखल घेऊन न्यायालाने या नोकर भरतीला अंतरीम स्थगिती देताना याचिकेची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवली.
 

Mumbai,news, Job, recruitment, in the high, court, Dispute,