Fri, Jul 19, 2019 07:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच

Published On: Mar 24 2018 2:11AM | Last Updated: Mar 24 2018 2:10AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळविल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत जोरदार खंडन केले. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणातून त्यांनी मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा व्यवहार फायद्याचा सौदा असल्याचे सांगत विरोधकांनी उपस्थित केलेल्या संशयाचा पर्दाफाश केला. मुंबई हे नैसर्गिक वित्तीय केंद्र असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे केंद्र मुंबईतच होईल. इतकेच नाहीतर बुलेट ट्रेनचे  काम करणार्‍या जपानमधील कंपनीला मुंबईतील स्थानकाखालील जमिनीची सुमारे 3 हजार कोटी रुपयांना विक्री करण्यात येईल. 

या रकमेतून ही कंपनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या इमारतीची पायाभरणी करील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांच्यासह भाई जगताप यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना बुलेट ट्रेनचा घाट्याचा सौदा कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करत व्यवहारावर संशय व्यक्त केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चीन आणि जपानचे उदाहरण दिले. ते म्हणाले, या देशांचा  विकासदर कमी असतानाही त्यांनी बुलेट ट्रेनचा प्रयोग 

 

तुम्ही राज ठाकरेंचे भाषण ऐकूण आलात वाटतं? 

 गुढीपाडव्यानिमित्त मनसेने शिवाजी पार्कमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन हा घाट्याचा सौदा असल्याचे सांगत सरकारवर टीका केली होती. शुक्रवारी विधान परिषदेत दत्त आणि जगताप यांनीही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण हा करार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2012 ला केला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या मार्गावरील प्रवाशांची आकडेवारी, तिकीट दराची माहिती देत मुख्यमंत्री तिरकसपणे म्हणाले, आपण राज ठाकरेंचे भाषण ऐकून आलात वाटतं! यावर सभागृहात एकच खसखस पिकली.
 

 

tags :Mumbai,news,International,Financial, Services, Center,