Mon, Jun 17, 2019 02:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा

भारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

2016 या संपूर्ण वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने एकूण 11 लाख चोरांना पकडले आहे. रेल्वेतील सामानासोबत ट्रॅकची चोरी करताना या चोरांना पकडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 2 लाख 23 हजार चोरांचा तर उत्तर प्रदेशातील 1 लाख 22 हजार चोरांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे चोरांचा अड्डा झाली आहे की काय, असा प्रश्‍न सर्वांना पडला तर नवल वाटायला नको. 
चोरांनी रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, ब्लँकेट, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा यासारख्या अनेक वस्तू लंपास केल्या आहेत. आरपीएनने लोकांना फिशप्लेट्स, बोल्ट्स, तारा, ट्यूबलाइट, पंखा, टॉवेल आणि ब्लँकेट यासारखे सामान चोरताना पकडले आहे. यामध्ये मध्यप्रदेशातून जवळपास 98 हजार लोकांना अटक करण्यात आली आहे तर तामिळनाडूतून 81,408 आणि गुजरातमधून 77,047 लोकांना पकडण्यात आले आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगल्या दर्जाच्या तारा आणि तांब्याच्या वस्तूंवर चोरांचा डोळा असतो. तसेच रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या कोचमधून बर्‍याचदा सामानही लंपास करण्यात येते.