Mon, Feb 18, 2019 20:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वक्‍तव्यामागे राजकीय हेतू नव्हता :चंद्रकांत पाटील

वक्‍तव्यामागे राजकीय हेतू नव्हता :चंद्रकांत पाटील

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 12:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी घडलेला प्रकार हा सहज जाणिवेतून घडलेला प्रकार आहे. यामध्ये आपला कोणताही राजकीय हेतू नव्हता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍नावर समन्वयक मंत्री म्हणून आपण प्रभावी पाठपुरावा केल्याचा दावाही त्यांनी केला. 

सीमा प्रश्‍नासंबंधी समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक झाल्यापासून आपण प्रभावी पाठपुरावा केला आहे. सीमा प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयातील दाव्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ व त्यांच्या सहायक वकिलांची टीम कामकाज पाहत आहे. सीमा भागात मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाबाबतही महाराष्ट्र सरकार गांभीर्याने दखल घेईल, यासाठीही आपण विशेष प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.