Fri, Apr 19, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवयवदानासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करा

अवयवदानासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करा

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:39AM

बुकमार्क करा
मुंबई :

अवयवदानासंदर्भात आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात एका वैद्यकीय समितीची नियुक्‍ती करावी, असे निर्देशही न्या. नरेश पाटील आणि एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या पीठाने दिले आहेत. 

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या स्वप्निल राऊतने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. मुंबईतील एका इस्तिपळात स्वप्निलसारखाच आजार असलेला एक रुग्ण ब्रेन डेड झालेल्या रुग्णाकडून अवयवदानाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, अवयवदान करणारी व्यक्‍ती हृदयविकाराने मृत्यू झाल्याने त्याच्या आशेवर पाणी फिरले गेले. अवयवदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच आरोग्य विभागाने इस्पितळाला तसे करण्यापासून रोखले होते. रुग्णाचे अवयव जर चांगल्या परिस्थितीत असतील, तर दुसर्‍या रुग्णाला वाचवण्याची संधी होती, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. 
हे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करताना न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.