होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई हायकार्ट 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार

मुंबई हायकार्ट 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार

Last Updated: Mar 27 2020 1:28AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना दक्षता म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई ,नागपूर ,औरंगाबाद ,गोवा खंडपीठाचे नियमित कामकाज  15 एप्रिलपर्यंत  बंद ठेवणयाबरोबरच दैनंदिन कामकाजाची वेळही कमी करण्यात आली आहे.  केवळ तातडीची  गरज असणार्‍या याचिकांवर  सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्यावतीने रजिस्टर जनरल एस.बी. अगरवाल यांनी आदेश काढले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी  मुंबई उच्च न्यायालयाने 14 मार्च रोजी न्यायालयाचे नियमित कामकाज बंद करून केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी  घेण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर न्यायालयाच्या कामकाजावरही निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला,  तो 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. केवळ तातडीच्या याचिकांवरच सुनावणी घेण्यात येणार आहे.