Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-गोवा हायस्पीड ट्रेन

मुंबई-गोवा हायस्पीड ट्रेन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


मुंबई/नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

मुंबई-गोव्यासह देशातील सात अतिशय व्यस्त रेल्वे मार्गांवर 200 कि.मी. प्रतितास वेगाने धावणार्‍या हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी फ्रान्सच्या एसएनसीएफशी करार केला जाणार आहे. यातील पहिली हायस्पीड ट्रेन दिल्‍ली-चंदिगड मार्गावर धावणार आहे. त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

245 किलोमीटर अंतर असलेला दिल्‍ली-चंदिगड कॉरिडोर उत्तर भारतातील सर्वात व्यस्त मागार्र्ंपैकी एक आहे. यावर फ्रान्सच्या कंपनीच्या मदतीने 200 कि.मी. प्रतितास वेगाने धावणारी रेल्वे सुरू करण्याची योजना आहे. यासंदर्भात 1700 पानांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून सोमवारी भारतीय रेल्वे याला अंतिम मंजुरी देणार आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों जानेवारीत भारत दौर्‍यावर येणार असून त्यासाठी ही योजना औपचारिकपणे सादर केली जाईल. त्याचवेळी एसएनसीएफशी रेल्वे विभाग करारदेखील करणार आहे. 

योजना प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्‍ली-चंदिगड अंतर अवघ्या दोन तासांत कापले जाईल. याशिवाय चेन्‍नई-हैदराबाद,  म्हैसूर-चेन्‍नई, दिल्‍ली-कानपूर आणि नागपूर-सिकंदराबाद आदी मार्गांवरदेखील हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.