होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किंग्ज सर्कल परिसरात रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकला

किंग्ज सर्कल परिसरात रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकला

Published On: Jun 25 2018 1:34PM | Last Updated: Jun 25 2018 1:31PMमुंबई : प्रतिनिधी

किंग्ज सर्कल परिसरामध्ये रेल्वे पुलाखाली एका मोठ्या कंटेनरने बॅरिकेटला धडक दिली. ही धडक बसल्यानंतर तो कंटेनर रेल्वे पुलाखाली अडकला. रविवारी रात्री ही घटना घडली असून याचा फटका या भागातील वाहतुकीला बसला आहे. या अपघातात कुणी जखमी झालेले नाही.

कंटेनर्सच्या साहाय्याने मुंबईमधून वस्तूंची आयात निर्यात सुरू असते. ट्रक, कंटेनर यांचा विचार करूनच मुंबईतील पूल, रेल्वे पूल यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या कंटेनरच्या वाहतुकीचे रस्ते देखील निश्चित करण्यात आले आहेत, असे असताना देखील एक धडक बसून हा कंटेनर अडकल्याने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाचा : कर्नाळाजवळ पूल खचला; मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प