Mon, May 27, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयुक्तांच्या कार्यालयाला भ्रष्टाचाराची लागण : निरुपम

आयुक्तांच्या कार्यालयाला भ्रष्टाचाराची लागण : निरुपम

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:41AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिल आगीला पालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार आहेत, त्यामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना निलंबित करावे, महापालिका आयुक्तांचे कार्यालय हे भ्र्रष्टाचाराची गंगोत्री झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. राजकीय नेत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आयुक्तांनी मुंबईकरांची दिशाभूल करण्यासाठी केला आहे. अन्यथा त्यांनी दबाव टाकणार्‍या नेत्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान निरुपम यांनी केले. 

आग लागलेल्या मोजोस या पबचे 6 पैकी 5 मालक नागपूरचे आहेत. भाजप व नागपूरचे हे कनेक्शन आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी टाळाटाळ होत आहे. एका मालकाचे वडील हवालाचे मोठे दलाल असून दिल्लीतील भाजप नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे ढिसाळ तपास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.