Thu, Jun 27, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती द्या : मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती द्या : मुख्यमंत्री

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:49AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि दळणवळाच्यादृष्टीने नवी मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्वाच्या आहे. या प्रकल्पासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची निवड करून सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. आता प्रत्यक्ष विमानतळ उभारणीच्या कामाला गती द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात सिडको व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेडच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व विमानतळ कंपनीतर्फे जीव्हीकेचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, मुंबई विमानतळ कंपनीचे राजीव जैन उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची निवड झाली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदार यांनी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली. या कंपनीबरोबर आज सवलत करारनामा, राज्य शासनाचा पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वाचे करार करण्यात आले.