Wed, Feb 20, 2019 08:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वेच्या मोटारमनचे ओव्हरटाईम बंद आंदोलन  

मध्य रेल्वेच्या मोटारमनचे ओव्हरटाईम बंद आंदोलन  

Published On: Aug 10 2018 12:36PM | Last Updated: Aug 10 2018 12:36PMमुंबई : प्रतिनिधी 

ना बिघाड, ना रुळाला तडे सर्व काही सुरळीत असताना शुक्रवार सकाळपासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. तर आतापर्यंत ९ लोकल गाड्यांच्या फेऱ्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मोटरमननी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू केले असून ओव्हर टाईममुळे मोटरमनवर कामाचा ताण पडत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच ओव्हर टाईम करणार नाही असे स्पष्ट केले आहे. याचाच परिणाम झाल्याने आज गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.

मध्य रेल्वच्या मोटरमननी वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे प्रशासन दूर्लक्ष करत आहे, असा आरोप मोटरमन प्रतिनिधी यांनी केला आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारपासून जादा तास काम न करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मोटरमन प्रतिनिधी आणि मध्य रेल्वे प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. पण या बैठका निष्फळ ठरल्याने आज आंदोलन सुरू झाले असून मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र त्याचा त्रास कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला सहन करावा लागत आहे.

रेल्वे मोटरमनच्या प्रमुख मागण्या

लाल सिग्नल चुकविल्यास सेवेतून मुक्त केले जाते, ही कारवाई कमी करण्यात यावी सध्या ६७१ मोटरमन सेवेत असून तब्बल २७१ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरणे  अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.